नाशिक : कोटमगावला फक्त ऑनलाईन दर्शन! चारही बाजूचे रस्ते बंद

due to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closed
due to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closeddue to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closed

येवला (जि. नाशिक) : नवरात्रोत्सवात लाखो भाविकांच्या गर्दीमुळे कोटमगाव येथील जगदंबा मातेचे मंदिर व यात्रा यंदाही लॉकडाऊन आहे. पहिली माळ असल्याने आज येथे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. प्रशासनाने भाविकांना पूर्णतः प्रवेश बंदी केली असून चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहे. दर्शनासाठी ट्रस्टने ॲपद्वारे लाइव्ह दर्शनाची सोय केली आहे.


पहिल्या दिवशी आज अवघ्या १५-२० जणांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते आज सकाळी पूजन व घटस्थापना करून देवीची आरती करण्यात आली. भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, अध्यक्ष राऊसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृषी सभापती संजय बनकर, सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रदीप सोनवणे, शरद लहरे, नानासाहेब लहरे, दिलीप कोटमे, रामचंद्र लहरे, दत्ता निकम, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, रामचंद्र लहरे, आप्पासाहेब चव्हाण, बाळासाहेब धांद्रे, अर्जुन कोटमे, ग्रामसेवक गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

due to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closed
नाशिक जिल्‍ह्यात 897 ॲक्‍टिव्‍ह Corona रुग्‍ण


श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वतीचे रूप असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेची मोठी महती आहे. याचमुळे राज्यभरात अन गुजरातपर्यंत देवीचे भक्त असून नवरात्राच्या काळात नऊ दिवस येथे तीन हजारावर महिला व पुरुष नऊ दिवस घटी बसतात. शिवाय या नऊ दिवसात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्याही लाखात असते. सलग दुसऱ्या वर्षी मात्र हा उत्साह नाही. येथे भक्तांची रीघ लागत असल्याने गावात प्रवेश करता येणारे वैजापूरच्या दिशेने तसेच विठ्ठलाचे कोटमगावच्या बाजूने असणारा रस्ता बंदिस्त करण्यात आला आहे. औरंगाबाद महामार्गालगत गावात मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त आहे. येथून कुणालाही आत सोडले जाणार नसून २४ तास पोलिस बंदोबस्त असेल. ग्रामस्थांनाही जाण्या-येण्यासाठी आधारकार्ड दाखविल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे गर्दी होण्याचा आणि भाविकांना दर्शनाचा मार्ग

due to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closed
नाशिक : आडगावच्या दुर्गा पतसंस्थेत पावणे ३ कोटींचा गैरव्यवहार

लाइव्ह दर्शनासाठी अँप!

भक्तांचा हिरमोड होऊ नये म्हणून जगदंबा माता ट्रस्टने थेट दर्शनासाठी ॲप विकसित केले आहे. प्ले स्टोअरवर जगदंबामाता या नावाने हे ॲप डाऊनलोड करता येईल. यावर ऑनलाइन दर्शनासह सकाळी आठ व संध्याकाळी नऊला होणारी आरतीही लाईव्ह दिसणार आहे. रोज ८ ते १० स्थानिकांच्या उपस्थितीत सकाळी आठला व रात्री नऊला आरती केली जाणार आहे. गुरुवारी १४ तारखेला दुपारी चारला होमपूजा होणार आहे.
कोरोनामुळे प्रवेशबंदीचे संकट ओढावले आहे. येथे गर्दी टाळण्याची गरज असून देवीचे लाखो भक्त असून त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नियमांची अंमलबजावणी करत आहोत, भाविकांनीही सहकार्य करावे असे आवाहन जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे यांनी केले.

due to the crowd of devotees during navratri festival temple at kotamgaon is closed
नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या


तालुक्यासह शेजारील नगर जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे ग्रामपंचायत, जगदंबा माता ट्रस्ट व तालुका प्रशासनाच्या बैठकीत कोटमगाव येथील मंदिर लोकहितासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीने भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी सहकार्य करावे व गर्दी करू नये.
- बाळासाहेब लोखंडे, भुजबळ संपर्क कार्यालय प्रमुख, येवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com