esakal | नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या पुन्‍हा नऊशे पार
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या पुन्‍हा नऊशे पार

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या ही कोरोनामुक्‍त रुग्‍णांपेक्षा अधिक राहत असल्‍याने पुन्‍हा ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आठशेपर्यंत खालावलेली असतांना या संख्येने पुन्‍हा नऊशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (ता.१५) जिल्‍ह्यात १०३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर ६५ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ३७ ने वाढ झाली असून, जिल्‍ह्यात ९२९ बाधितांवर उपचार सुरु आहेत.


बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३३, नाशिक ग्रामीणमधील ६२ रुग्‍णांना कोरोनाचे निदान झाले आहे. जिल्‍हा बाहेरील आठ रुग्‍णांचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आला. मालेगावला दिवसभरात नव्‍याने बाधित आढळला नाही. दरम्‍यान जिल्‍ह्‍यात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत हा नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.


सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ७० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ६९५, मालेगावच्‍या २२१, नाशिक शहरातील १५४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. संशयित रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविगीकरणात दिवसभरात ८८३ संशयित दाखल झाले. यापैकी ८७३ संशयित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. ग्रामीण भागातील पाच रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

हेही वाचा: नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांचा ५ वर्षांतील उच्चांक

loading image
go to top