नाशिक- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्याच्या परिसरात रविवारी (ता. ६) पर्यटनासाठी गेलेले १२ ते १५ पर्यटक अडकून पडले होते. वन विभागाकडून त्यांची सुटका करण्यात आली. तळवाडे येथील तलावात बुडून मनीष पवार (वय ३२, रा. सातपूर) या युवकाचा मृत्यू झाला. ठाण्यापाड्यात दोन ठिकाणी भिंत कोसळल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.