द्वारका चौकातील ७६ दुकानांना निष्कासन नोटीस

द्वारका चौकातील ७६ दुकानांना निष्कासन नोटीस
Published on: 
टूडे साठी --------------- द्वारका चौकातील ७६ दुकानांना निष्कासन नोटीस पहिल्या दिवशी ३७ व्यावसायिकांची सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : द्वारका चौकातील रस्ता रुंदीकरणासाठी ७६ अतिक्रमित व्यावसायिकांना निष्कासनाच्या अंतिम नोटिसा बजावल्यानंतर बुधवारी (ता. २१) सुनावणी प्रक्रिया राबविली. पहिल्या टप्प्यातील सुनावणीत ३७ व्यावसायिकांनी बाजू मांडली. दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार (ता. २३) उर्वरित व्यावसायिकांना बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेने वर्दळीच्या व मोक्याच्या द्वारका चौकातील जागेचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. द्वारका चौकातील जागा मूळतः महापालिकेच्या मालकीची आहे. महापालिकेने १९७३ पासून सदर जागा दुकानदारांना भाडेतत्त्वावर दिली. सद्यःस्थितीत १०९ दुकानदार व्यवसाय करतात. २०१५ मध्ये महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी व्यावसायिकांना नोटिसा दिल्या. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ७६ जणांना अंतिम नोटिसा बजावल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या भूखंडावर कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर उभारण्याचे नियोजन असून, रस्ता रुंदीकरणाची कामेही मंजूर झाली आहेत. द्वारकेच्या जागेबाबत सुनावणी सुरू झाली आहे. ३७ व्यावसायिकांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्याचे अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी माहिती दिली. ---चौकट कागदपत्रे नसल्याचे समोर सुनावणीत अनेकांकडे मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेने जागेबाबत हक्क सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते, मात्र कोणताही पुरावा सादर करता आला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com