Dwarka Circle
sakal
नाशिक: द्वारका सर्कल येथील भुयारी मार्गाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. त्यासाठी द्वारका चौकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर हेवी गर्डर कमानी टाकण्यात आले. परंतु, या हेवी गर्डरला धडकून सातत्याने अपघात होत आहेत. यामुळे सारडा सर्कल, काठे गल्ली येथील गर्डरच्या कमानी हटविल्या असल्या तरीही उभ्या गर्डरच्या खांबांना आता वाहने धडकून अपघाती घटना घडत आहेत. यातून वाहतूक सुरळीत होण्याऐवजी त्रुटीच समोर येत आहेत.