
Crime : द्वारका खून प्रकरण; फरारी मुख्य संशयित अटकेत
जुने नाशिक : द्वारका परिसरातील पोर्णिमा बसस्टॉप येथे हरीश भास्कर पाटील (४९, रा. पुणे) यांचा खून झाला होता. यातील फरारी मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Dwarka murder case main suspect arrested Nashik News)
दारूच्या नशेत असलेल्या संशयितांच्या दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून हरीश पाटील यांचा खून झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून ओळख पटली. संशयित विहीतगाव येथील असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, राजेंद्र निकम, रमेश कोळी, सागर निकुंभ, कयूम सय्यद, विशाल काठे, लक्ष्मण ठेपणे, संजय पोटींदे, गोरख साळुंके, धनंजय हासे गणेश निंबाळकर, रतिलाल ईशी आदींनी विहीतगाव गाठले. अशोक दत्ता हिंगे (१९), नदीम सलीम बेग(२३), रोहित अशोक पताड (१९), शुभम दिलीप घोटेकर (२०) या चौघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा: Nashik : सामान्यांच्या ताटातुन चपाती होणार कमी
पाचवा सहकारी मुख्य संशयित फरार होता. गुन्हे शोध पथक त्याच्या मागावर होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार अस्वली येथून मुख्य संशयित राजेश बाळू गवळी यास ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, अशोक हिंगे, शुभम घोटेकर यांचा खुनाच्या घटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित नदीम बेग, रोहित पताडे आणि राजेश गवळी या तिघांनी मिळूनच पाटील यांचा खून केल्याचे उघड झाले. तिघांना शनिवारी (ता. २१) न्यायालयात हजर केले असता, त्यांना मंगळवार (ता.२४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा: तयारी खरिपाची; पुन्हा पांढर सोनं, मका, सोयाबीनचाच बोलबाला!
Web Title: Dwarka Murder Case Main Suspect Arrested Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..