Latest Marathi News | गंगापूर रोडला E- Bikeने घेतला पेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Vehicle Fire Accident News

Fire Accident : गंगापूर रोडला E- Bikeने घेतला पेट

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वाहने पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथे फुटपाथवर पार्क केलेल्या ई-बाईकने पेट घेतल्याचा प्रकार गुरुवारी (ता.२९) दुपारी घडला. व्यावसायिकांनी वेळीच सावधगिरी बाळगून त्यांच्याकडील आग प्रतिरोधक पावडर फवारली. तसेच घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने दुचाकीला लागलेली आग विझविली. (E Bike caught fire at Gangapur Road Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: 5 वर्षानंतर प्रथेनूसार गडावर होणार बोकड बळी विधी; न्यायालयाने बंदी उठवली

इलेक्ट्रिकल वाहने पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. रवींद्र आव्हाड हे गुरुवारी (ता.२९) दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या ई-बाईकवरून गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथे आले होते. फुटपाथजवळ बाईक पार्क केली आणि काही खरेदी करण्यासाठी ते गेले. त्यानंतर काही वेळेतच त्यांच्या बाईकमधून धुर निघू लागला.

सदरची बाब आव्हाड यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. काही वेळात बाईकने पेट घेतला. त्यावेळी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानास असलेल्या आग प्रतिरोधक पावडरीची फवारणी पेट घेतलेल्या बाईकवर केली. तर या घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथून अग्निशमन दलाचा बंब दाखल होईपर्यंत पेटलेली बाईक विझविण्यात बऱ्यापैकी यश आले होते.

अग्निशमनच्या जवानांनी बाईकवर फवारणी करून आग विझविली. या घटनेमुळे परिसरात काहीशी भितीचे वातावरण पसरले होते. गंगापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: साडेदहा लाखांचे दागिने चोरणारा जावई गजाआड; चावी चोरून केली घरफोडी

टॅग्स :NashikFire Accidente bike