ई- केवायसी बंधनकारक

ई- केवायसी बंधनकारक
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- लोगो छायाचित्र ः 31126 -- अनुदानित गॅससाठी आता ई- केवायसी बंधनकारक - नियम लागू : अन्यथा लाभ थांबविणार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अर्थात ई- केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप ई- केवायसी न केलेल्या ग्राहकांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. प्रमाणीकरण न केल्यास गॅस अनुदान थांबण्याची शक्यता आहे. ई- केवायसीसाठी गॅस कनेक्शनशी ग्राहकाचा मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. सिलिंडर वितरणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे घरीच बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येते. गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊनही ही प्रक्रिया मोफत पूर्ण करता येईल. घरबसल्या इंडेन गॅससाठी ‘इंडियन ऑईल वन’, भारत गॅससाठी ‘हॅलो बीपीसीएल’, तर एचपी गॅससाठी ‘हॅप्पी पे’ अ‍ॅपद्वारे ई- केवायसी करता येणार आहे. ई-केवायसीमुळे अनुदानाचा लाभ पात्र घरगुती ग्राहकांनाच मिळतो का, याची पडताळणी करता येणार आहे. घरगुती वापरासाठीच्या अनुदानित सिलिंडरचा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर रोखणे, एकाच व्यक्तीच्या नावावरील अनधिकृत कनेक्शन्स शोधणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com