नाशिक: जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ झाला. पण, सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे जिल्ह्यात केवळ ११.४१ टक्के क्षेत्राची नोंदणी झाली आहे. नोंदणीसाठी १५ सप्टेंबरची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत १२ लाख ६४ हजार ७३४ हेक्टर आर क्षेत्राची नोंदणी मुदतीत पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.