नाशिक : रात्री गाढ झोपेत नागरिकांना मोठा हादरा; दिंडोरीत नागरिक दहशतीखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dindori earth quake

नाशिक : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के; ग्रामस्थांत भिती

वणी (जि.नाशिक) : रात्रीच्या साडेअकराच्या सुमारास दिंडोरीतील नागरिक झोपेत असताना आवाज होत मोठा हादरा बसला. या घटनेने क्षणभर नागरिक घाबरून उठल्याचा प्रकार घडला. त्यांना काही कळेना नेमके काय सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

रात्री गाढ झोपेत असताना मोठा हादरा; दिंडोरीत भुकंप?


दिंडोरीतील बाबापूर परिसरात महिनाभरापासून भुकंपसदृश्य जमिनीला हादरे बसण्याच्या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, बुधवारी (ता. १५) रात्री साडेअकराला आवाज होत मोठा हादरा बसल्याने झोपेत असलेले काही रहिवाशी घाबरून उठल्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व मेरी येथील भूकंप आधार सामुग्री पृथ्थकरण कक्षात कळविण्यात आली. ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपली कामे नियमित सुरू ठेवण्याचे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यातील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाबापूर, मुळाणे येथे बुधवारी (ता. १५) रात्री ११ ते गुरूवारी (ता. १६) पहाटेपर्यंत ९ ते १० भुकंपाचे सौम्य धक्के बसल्याचा दावा ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे केला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती पोलिस पाटील, सरंपच व तलाठी यांनी तहसीलदार पंकज पवार यांना कळविली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

हेही वाचा: पुढील 3 महिने पोलीसांची कसोटी! साप्ताहिक सुट्यांवरही फुली

या वेळी मंडळ अधिकारी केसरे, तलाठी पवार, सरंपच गुलाब गावित, पोलिस पाटील जितेंद्र गायकवाड, मोहन वाघ, सुभाष राऊत, चेतन राऊत, नामदेव पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: मनमाड रेल्वे स्थानकाची कसून तपासणी; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त

Web Title: Earthquake Dindori Taluka Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..