Healthy Diet
Healthy Dietesakal

Healthy Diet : हलकाफुलका आहार घ्या, अन्‌ सुदृढ राहा.! अशी घ्या काळजी..

बदलत्‍या वातावरणारुप आहार-विहारातील बदल आवश्‍यक

नाशिक : सध्या ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस पडत असला तरी गेल्‍या आठवड्याभरापासून उन्‍हाचे चटके जाणवू लागले आहेत. वातावरणात होत असलेल्‍या बदलानुसार आहारात बदल आवश्‍यक आहेत.

हलकेफुलके आहार घेताना, सुदृढ राहण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. दिनचर्येत आवश्‍यक बदल करणेही आवश्‍यक असल्‍याचे सांगितले जात आहे. (Eat light diet stay healthy Changes in diet and lifestyle necessary as environment changes nashik news)

यंदा उन्‍हाळ्याची तीव्रता अधिक राहणार असल्‍याचा अंदाज वर्तविला जातो आहे. आत्तापासून पारा वाढत असून दिवसाच्‍या वेळी उन्‍हाच्‍या तप्त झळा जाणवू लागल्‍या आहेत. अशात आहारात उचित बदल करताना व आवश्‍यक काळजी घेताना निरोगी राहण्याचा सल्‍ला दिला जातो आहे.

या काळात पचन क्षमता कमी होत असल्‍याने हलकेफुलके पदार्थ आहारात घेणे योग्‍य ठरते. तसेच, पाणी व अन्‍य पेयांचा समावेश करताना एकाच वेळी सेवन न करता टप्‍याटप्‍याने सेवन करण्याचा सल्‍लादेखील दिला जातो आहे.

विद्यार्थ्यांनी निरोगी राहणे आवश्‍यक

अगदी दहावी, बारावीपासून विविध इयत्तांच्‍या परीक्षांचा हा कालावधी असतो. अशावेळी विद्यार्थ्यांनी निरोगी राहणे आवश्‍यक असते. घराबाहेर उन्‍हात जाताना उपरणे, टोपीद्वारे बचाव करताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

लहान मुलांना कच्चे दूध, साय लावल्‍यास त्‍वचा चांगली राहाते. अतिथंड पेयाचे सेवन टाळावे. अखरोड, काळे मनुका, बदाम, सुके खोबरे यांचा सेवन करावा.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Healthy Diet
Balanced Diet: तुम्ही संतुलित आहार घेता का? काय खावं नाश्ता आणि जेवणाला? हे वाचाच

अशी घ्या काळजी..

* दिवसाच्‍या वेळी ताक उपयुक्‍त, रात्री सेवन टाळावे.

* दिवसभर साधे पाणी, तर रात्री कोमट पाणी प्‍यावे.

* उसळ, मुग, मसूर, चवळी, मटाराचा आहारात समावेश करावा

* पालेभाज्‍या सुकत असल्‍याने, फळभाज्‍यांचे प्रमाण वाढवावे

* भात, तांदळाच्‍या पदार्थांचा आहारातील समावेश वाढवावा

* एकाच वेळी द्रवपदार्थांचे सेवन करण्याऐवजी टप्‍याटप्‍याने घ्यावे.

* डाळिंब, आल्‍यासह लिंबाचा रस, कोकम सरबत उपयुक्‍त

* आमसूल सार उत्तम टॉनिक, गुलकंदचे सेवन दिवसा करावे

* गोड पदार्थ खाल्‍यानंतर पाणी पिणे टाळावे.

* कफ, दमा, संधिवाताचा त्रास असलेल्‍यांनी फॅनखाली झोपू नये.

* एसीचा मर्यादित स्वरूपात वापर असावा.

* अंडी, मांसाहाराचे प्रमाण घटवावे, मर्यादित ठेवावे

"ऋतुमानात झालेल्‍या बदलामुळे आहारात बदल करायला हवा. पचनशक्‍ती कमकुवत होत असल्‍याने हलकेफुलक्‍या पदार्थांचा आहारात समावेश करावा. अतिथंड, थंड पेयाचे सेवन टाळावे. अंडी, मांसाहाराचे सेवन कमी करावे. आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा." - वैद्य विक्रांत जाधव.

Healthy Diet
Health Tips : फ्रिजमध्ये ठेवलेल्या या गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर थेट रूग्णालयात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com