स्मार्ट सिटीच्या सुशोभीकरण्याच्या कामाला अतिक्रमणाचे ग्रहण | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart City

स्मार्ट सिटीच्या सुशोभीकरण्याच्या कामाला अतिक्रमणाचे ग्रहण

म्हसरूळ : गणेशवाडी मरीमाता मंदिरापासून टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या नवीन शाही मार्गाचे स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्मार्ट बनविण्यात आलेल्या या रोडच्या पादचारी मार्गावर काहींनी झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांचे अतिक्रमण या स्मार्ट रोडचे ओंगळवाणे दर्शन घडवीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवर होणारे अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

गोदा काठावरच्या भागात स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक काम सुरू आहेत. त्यातील नवीन शाही मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मार्गाचे सुशोभीकरण, त्यावर पथदीप, पेव्हर ब्लॉक, नदीच्या बाजूला सिमेंटच्या जाळ्या टाकून या मार्गाचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. वळणाच्या मार्गात पादचारी मार्गही सुरेख बनविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बऱ्याच ठिकाणी हा पादचारी मार्ग रुंद असून त्याला आकर्षक डिझाईन करण्यात आले आहे. नेमक्या अशा भागातच काही भटक्या निरीक्षित लोकांनी तेथे झोपड्या थाटल्या आहेत.

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

नाशिकमध्ये येणारे पर्यटक व भाविक हे रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्वर, सीता गुंफा यासारख्या धार्मिक स्थळांना भेटी देतात. त्याच प्रमाणे तपोवनातील पौराणिक स्थळांना भेटी देण्यासाठी याच नवीन शाही मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या मार्गावर अशा प्रकारे अतिक्रमण केलेल्या झोपड्यांचे ओंगळवाणे दर्शन घडत आहे. गोदा घाटाच्या परिसरात अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात येथील अतिक्रमण काढून येथील लोकांची व्यवस्था महापालिकेने निवारा शेडमध्ये केली होती. मात्र, तेथे हे लोक थांबत नाहीत. त्यांनी पुन्हा या भागात अतिक्रमण करीत झोपड्या उभारल्या आहेत. त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

Web Title: Eclipse Of The Work Of Beautification Of The Smart City Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikDevelopment