Crime
sakal
नाशिक: उच्चशिक्षित युवकाने झटपट पैसे कमविण्यासाठी सराफी दुकान लुटीचा कट रचला. त्यासाठी त्याने नाशिक-पुणे महामार्गावरील बंदूक विक्रीच्या दुकानात ग्राहक बनून गेला आणि एअर पिस्तूल गन हिसकावून पसार झाला. मात्र शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या संशयित युवकाचा कट सफल होण्यापूर्वीच उधळून लावला आहे. संशयित युवकाला उपनगर परिसरात सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.