Teacher Eligibility Reform: घोकंपट्टीवर आधारित शिक्षक पात्रता परीक्षा बदलण्याची गरज : जेष्ठ शिक्षण अभ्यासक भाऊसाहेब चासकर यांची भूमिका

घोकंपट्टीवर आधारित शिक्षक पात्रता चाचणीऐवजी व्यावसायिक कौशल्ये, प्रत्यक्ष अध्यापन आणि क्रेडिट प्रणालीवर भर देणारी नवी परीक्षा रचना करण्याची जेष्ठ शिक्षण अभ्यासकांची मागणी
Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.

Sakal

Updated on

इगतपुरी : शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा मुलांचा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षक म्हणून आपण बांधील आहोत.मात्र सध्याची शिक्षक पात्रता चाचणी ही शिक्षक म्हणून अपेक्षित क्षमतांची पडताळणी करण्यासाठी अपुरी असून केवळ घोकंपट्टी आणि पाठांतरावर आधारित असलेली ही शिक्षक पात्रता चाचणी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्यासाठी पुरेशी नाही,म्हणून शिक्षकांची पात्रता खऱ्या अर्थाने तपासण्यासाठी शिक्षक पात्रता चाचणीची तातडीने पुनर्रचना करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षण अभ्यासक भाऊसाहेब चासकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित शिक्षण विकास मंचच्या शिक्षण कट्ट्यावर ते बोलत होते.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नोलॉजी येथे ह्या शिक्षण कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com