नाशिक- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा बुधवारी (ता. २१) पहिल्याच दिवशी फज्जा उडाला आहे. तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळावर योग्य प्रकारे नोंदणीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे तांत्रिकी बाबींची दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे थेट प्रवेश वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. गुरुवारी (ता. २२) सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.