Teacher Eligibility Test
sakal
इगतपुरी: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रद्द करावी, तसेच राज्य शासनाने इतर राज्यांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २४ नोव्हेंबरला राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे येथे राज्य शिक्षक समन्वय समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत बुधवारी (ता. ५) घेण्यात आला. बैठकीत राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर महामोर्चा काढण्याचाही निर्णय झाला.