नाशिक- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेला सुरुवात झालेली आहे. सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. अभियांत्रिकी, एमबीए, विधी अभ्यासक्रमात प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे उत्साह निर्माण झाला आहे. अभियांत्रिकी, एमबीएसाठी नोंदणीची मुदत ८ जुलैपर्यंत देण्यात आली.