student
sakal
येवला: शालेय शिक्षण विभागाच्या यूडायस प्लसवरील विद्यार्थी नोंदणीतील वास्तव पुढे आले असून, पोर्टलवरील माहितीनुसार राज्यातील दोन कोटी १४ लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख ७८ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहे. शिक्षणहक्क कायद्याशी विसंगत अशी स्थिती निर्माण झाली. विद्यार्थी आधारकार्ड अपडेटसाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.