
सातपूर - नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील उद्योग केंद्रे व जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधणार आहे, अशी उद्योग संचालनालयाच्या सहसंचालक वृषाली सोने यांनी दिली.