Eknath Khadse, Girish Mahajansakal
उत्तर महाराष्ट्र
Eknath Khadse : बटण दाबलं तर तहलका माजेल; खडसेंचा महाजनांवर घणाघात
Eknath Khadse Demands Narco Test of Lodha in Honeytrap Scandal : आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत नार्को टेस्टची मागणी केली. सीडी, पेनड्राईव्हसह धक्कादायक खुलासे करत खडसेंनी संपूर्ण प्रकरण जनतेसमोर मांडले
जळगाव: महिलांबाबत मंत्री गिरीश महाजन यांचे नाव वारंवार पुढे का येते? महाजन यांचे नाव मी घेतले नाही. प्रफुल्ल लोढा यांनी पहिल्यांदा महाजनांचे नाव घेतले होते. महाजनांच्या सीडी माझ्याकडे आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत. मी बटन दाबले तर देशात तहलका माजेल, हे त्यांचे शब्द होते. लोढा सध्या सरकारच्या ताब्यात आहे. त्याची ‘नार्को टेस्ट’ करा. ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ बाहेर येईल, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत केली.