नाशिक: मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच राज्यात महायुतीचे सरकार असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे, अशी आग्रही मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी ही तर सर्वांची इच्छा असल्याचे सांगितले. दरम्यान, सामंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.