नाशिक- इंदिरानगर परिसरातील ब्रह्मकुमारीच्या ओमशांती शिबिरासाठी जात असलेल्या ७० वर्षीय वृद्धेला दुचाकीवरील दोघा भामट्यांनी आवाज देत थांबविले आणि पोलिस असल्याची बतावणी करीत त्यांच्याकडील साडेतीन लाखांचे दागिने हातचलाखीने लंपास करीत पसार झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.