Election
sakal
प्रशांत भरवीरकर- नाशिक: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगीनघाई सुरू असून कागदपत्रांच्या पूर्ततेबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून अर्ज भरण्याची वेळ शुभ आहे किंवा नाही याकडे प्रत्येकजण काटेकोरपणे लक्ष देत आहे. त्यासाठीचे मुहूर्तच काढले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीचे पंडित गणेश्वरशास्त्री द्रवीड यांच्याकडून मुहूर्त काढून घेत अर्ज भरल्यापासून अनेकांनी त्यांचा कित्ता गिरवायला सुरवात केली आहे.