
MVP Election : इच्छुकांसाठी निवडणूक नियमावली जारी; इच्छुकांकडून अनेक अर्ज
नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुकांना कुठल्याही एकाच जागेकरिता निवडणूक लढविता येणार आहे. परंतु अद्याप पॅनल व उमेदवारीबाबत असलेली अनिश्चितता लक्षात घेता, अनेक उमेदवारांकडून एकापेक्षा जास्त अर्ज घेतले जात आहेत.
दरम्यान, अर्जप्रक्रिया व अर्ज दाखल करण्याबाबत निवडणूक मंडळाने उमेदवारांच्या सोयीसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. (Election rules issued for aspirants Nashik MVP Election Latest Marathi News)
उमेदवारांचा संभ्रम टाळण्यासाठी या सूचना आहेत. दरम्यान, सभासदास कोणत्याही एका जागेसाठी (पदासाठी) निवडणूक लढविता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक पदासाठी पाच हजार रुपये अनामत ठेवली पाहिजे.
एकाच पदासाठी संबंधित उमेदवाराने एकाहून अधिक अर्ज केल्यास प्रथम दाखल अर्जासोबत पाच हजारांची अनामत ठेवल्याची मूळ पावती जोडावी. अन्य अर्जांसोबत स्वयंसाक्षांकित प्रत जोडायची आहे.
सभासद वर्गानुसार परिशिष्ट ‘ब’ किंवा ‘क’ या नमुन्यातील प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करायचे आहे. एकाच पदासाठी अधिकचे अर्ज करताना प्रतिज्ञापत्राची स्वयंसाक्षांकित प्रत जोडता येणार आहे. दुसऱ्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना अर्जासोबत स्वतंत्र मूळ प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहे.
प्रत्येक अर्ज व प्रतिज्ञापत्र स्वतंत्र असावे. प्रतिज्ञापत्राची झेरॉक्स चालणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पदासाठी प्रत्येक अर्ज व प्रतिज्ञापत्र हे मूळ स्वरूपात असावेत. तालुका सदस्य पदाकरिता संबंधित तालुक्याचा सभासद त्या-त्या तालुका मतदारसंघाच्या यादीतील आजीव सभासदाची सूचक व अनुमोदक म्हणून सही असावी.
हेही वाचा: NMC आयुक्तांनी 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा; वृद्ध दाम्पत्य
पदाधिकारी महिलांसाठी मैदान खुले
पदाधिकारी पदासाठी तसेच महिला सदस्याच्या जागेसाठी कोणत्याही मतदारसंघातील मतदारयादीत नाव असलेल्या आजीव सभासदाला उभे राहता येईल. अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून समाजाच्या कोणत्याही तालुक्यातील आजीव सभासदाची सही चालेल. महिला सदस्यपदासाठी मतदार यादीत समाविष्ट नावच ग्राह्य धरले जाईल.
‘त्या’ सेवकांना मुकावे लागणार
शिक्षक मतदारयादी ३१ मार्च २०२२ अखेरची असल्याने १ एप्रिल ते २८ ऑगस्टपर्यंत निवृत्त झालेल्यांचे निवृत्तीच्या तारखेनंतर सभासदत्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांना मतदानात सहभाग घेता येणार नाही. सेवेची पाच वर्षे शिल्लक असलेल्या सेवकांनाच उमेदवारीदेखील करता येणार आहे.
"उमेदवारांच्या सुविधेसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचना काटेकोरपणे वाचाव्यात. अर्ज खरेदीसाठी येताना सभासदात्वाचे ओळखपत्र बाळगायचे आहे. निर्धारीत वेळांचे पालन करत निवडणूक मंडळ कार्यालयात अर्जविक्री सुरू राहील."
- ॲड. भास्करराव चौरे, अध्यक्ष, निवडणूक मंडळ, मविप्र
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिरेबंदी प्रवेशद्वार उघडणार!
Web Title: Election Rules Issued For Aspirants Nashik Mvp Election Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..