NMC Election : दीड महिन्यात निवडणुका शक्य; आरक्षणासह मतदारयादी बदलणार

NMC Election Latest Marathi News
NMC Election Latest Marathi Newsesakal

नाशिक : राज्यातील शिंदे सरकारने चार सदस्यांच्या प्रभागाची घोषणा केल्यानंतर आता नाशिक शहरात पूर्वीप्रमाणे १२२ नगरसेवकांची प्रभाग रचना अस्तित्वात येईल.

२०१७ ची प्रभागरचना कायम ठेवली जाणार असली तरी मतदारांची संख्या वाढल्याने आरक्षणासह अंतिम मतदारयादी तयार करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Elections possible in one half months Nashik NMC Election Latest Marathi News)

महाविकास आघाडी सरकारच्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेत तीन सदस्यांची प्रभागरचना जाहीर केली होती. त्यात दोन ते अडीच टक्के वाढीव लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्यादेखील वाढवून १२२ वरून १३३ करण्यात आली होती.

१३३ नगरसेवकांची संख्या झाल्याने तीन सदस्यांचे ४४ प्रभाग अस्तित्वात आले. आता शिंदे सरकारने निर्णय बदलला असून, महापालिका निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रभागरचना जाहीर केली आहे.

त्या वेळी १२२ नगरसेवक नाशिकमध्ये होते. त्यानुसार ३१ प्रभाग अस्तित्वात येतील, परंतु २०१७ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरावी लागणार असल्याने आरक्षण सोडत व मतदारयादी नव्याने तयार कराव्या लागणार आहेत.

आरक्षण व मतदारयादी तयार करण्याबरोबर त्यावर हरकती व सूचना मागण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर निवडणुका घेणे शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NMC Election Latest Marathi News
घरोघरी तिरंगा : राष्ट्रभक्तीचा विद्यापीठातून निनाद!

विधानसभा मतदारयादी ग्राह्य

महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदारयादी ग्राह्य धरण्यात आल्या आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली असल्याने नव्याने मतदारयादी तयार कराव्या लागणार आहे. मतदार वाढल्याने आरक्षणदेखील बदलेल, अशी माहिती दिली.

दरम्यान, चार सदस्यांचा प्रभाग घोषित करण्यात आला असला तरी नेमके किती व कोणते बदल आहे यासंदर्भात आधी सूचना प्राप्त झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१७ मधील प्रभाग व आरक्षण स्थिती

- एकूण प्रभाग ३१

- नगरसेवक संख्या १२२

- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव

- अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव.

- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी चार जागा राखीव

अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पाच जागा राखीव

- इतर मागास प्रवर्गासाठी १६ जागा राखीव

- इतर मागास महिला प्रवर्गासाठी १७ जागा राखीव

- सर्वसाधारण ३२ जागा

- सर्वसाधारण महिला तीस जागा

NMC Election Latest Marathi News
ZP Election : निवडणुका लांबणार; किमान सदस्यसंख्येचा मुद्दा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com