घरोघरी तिरंगा : राष्ट्रभक्तीचा विद्यापीठातून निनाद!

Rajesh Pandey, President, Azadi Ka Amrit mahotsav
Rajesh Pandey, President, Azadi Ka Amrit mahotsavesakal

गेली ४० वर्ष विद्यार्थी चळवळीच्या निमित्ताने माझी सतत भ्रमंती होत राहिली आहे. खानदेशात दौरा असताना नंदुरबार आले, की मला किशोरवयीन शिरीषकुमार मेहता आठवायचा. मन भारावून यायचे. खेळायच्या वयात हाती तिरंगा घेऊन निधड्या छातीचा हा कोवळा पोरगा सवंगड्यांसह धारातीर्थी पडला. हा इतिहास अद्‍भुत आहे. (Indian Flag at every home slogan of patriotism from Pune university nashik Latest marathi news)

भारतीय स्वातंत्र्य लढ्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून आपल्या विद्यापीठाने काहीतरी नावीन्यपूर्ण करावे, असे सतत वाटू लागले.

माननीय कुलगुरू आणि सर्व व्यवस्थापन परिषदेसमोर मी एक कल्पना मांडली. ती अशी, की ही ‘राष्ट्रभक्तीची’ भावना प्रखरपणे महाविद्यालयीन तरुणांमध्ये निर्माण व्हावी म्हणून १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजाच्या सहाय्याने पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व नागरिक अॅपच्या माध्यमातून ध्वज फडकवताना स्वत:चा फोटो काढतील, अशा दीड लाख फोटोंचे संकलन करून ते गीनिज बुक ऑफ रेकॉर्डला पाठविण्यात येईल आणि या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला एक महोत्सव व अस्मितेचा उद्धार म्हणून पाहता येईल.

Rajesh Pandey, President, Azadi Ka Amrit mahotsav
Nashik : भंगार व्यवसायिकाकडून घंटागाडी कर्मचारीला बेदम मारहाण

माझ्या या कल्पनेला सर्व सहकाऱ्यांनी उचलून धरले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग या विद्यापीठाच्या दोन महत्त्वपूर्ण विभागांनी नियोजन केले आहे. नाशिकला व संगमनेरला आज प्राध्यापक व प्राचार्यांची बैठक होत आहे. पुण्याला या बैठकी झाल्या. भरघोस प्रतिसाद मिळतोय. तांत्रिक विभाग व नीनिजचे काम पाहणारे मिलिंद वेर्लेकर झोकून देऊन काम करीत आहेत.

९ ऑगस्ट २०२२ ली या महोत्सवाची सुरवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या वेळी ‘घरोघरी तिरंगा’ या युवा संकल्पाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ६०० महाविद्यालयांमधून आलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांप्रमाणे तीन हजार विद्यार्थी आणि ६०० कार्यक्रम अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरवात होईल.

१५ ऑगस्टला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा संकल्प गीनिज बुकच्या विश्वविक्रमाने पूर्णत्वास जाईल.

गीनिज हे आमचे उद्दिष्ट नाही, तर हा केंद्र व राज्य सरकारचा ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम विद्यापीठ पातळीवर ऐतिहासिक, संस्मरणीय बनवावा हा माझा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विद्यापीठाचा उपक्रम अधोरेखित व्हावा.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शिरीषकुमार मेहता, भगतसिंग, अनंत कान्हेरे, उस्ताद लहूजी साळवी,प्रीतीलता वढेदार, शांती घोष या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी मोठे योगदान दिले आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व विद्यापीठ कायद्यात राष्ट्रभक्ती या मूल्याला अधोरेखित केले आहे.

या पिढीत हा जाज्वल देशाभिमान निर्माण व्हावा, यासाठी सर्वांना या उपक्रमात सहभागी होणे म्हणजे राष्ट्राप्रति प्रेम व आदर व्यक्त करणे होय. तेव्हा यात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.

‘घरोघरी तिरंगा’ या युवा संकल्पाची ९ ऑगस्ट २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात होईल. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ६०० महाविद्यालयांमधून आलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांप्रमाणे तीन हजार विद्यार्थी आणि ६०० कार्यक्रम अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरवात होईल. १५ ऑगस्टला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा संकल्प गीनिज बुकच्या विश्व विक्रमाने पूर्णत्वास जाईल. - राजेश पांडे, अध्यक्ष, आझादी का अमृतमहोत्सव

Rajesh Pandey, President, Azadi Ka Amrit mahotsav
Nashik : कर्करोगग्रस्‍तांसाठी रिशा राठीकडून केस दान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com