Nashik Crime : विद्युतपंप चोरट्यांचा धुमाकूळ!; ताहाराबाद परिसरातील शेतकऱ्यांत संताप

The electric pump on the well here has been stolen.
The electric pump on the well here has been stolen.esakal
Updated on

ताहाराबाद (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील विद्युतपंपासह साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (electric water pump theft increased at taharabad area Nashik Latest Crime News)

The electric pump on the well here has been stolen.
Nashik Cyber Crime News : महिला डॉक्टरला ऑनलाइन 1 लाख 43 हजाराचा गंडा!

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील शेतकरी जयवंत सोमनाथ साळवे यांची अंतापूर रोडला रावेर शिवारात शेतजमीन आहे. या शेतामधील विहिरीवर बसविलेला १२ हजार रुपये किमतीचा ३- एचपी अश्‍वशक्तीचा विद्युतपंप, ३ हजारांचे स्टार्टर, शेतीसाठी लागणारी अवजारे ठेवण्याच्या खोलीचे दार तोडून अंदाजे वीस हजार रुपये किंमतीचे डिझेल इंजिन चोरट्यांनी लंपास केले. पंप, स्टार्टर, डिझेल इंजिन चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने वस्तूचा शोध घेतला. परंतु, यश आले नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. जायखेडा पोलिस तपास करीत आहेत.

"गेल्या दोन महिन्यांपूर्वी याच मळ्यातून १ एचपीचा विद्युतपंप व त्याची केबल, घरातील एका ५ एचपीच्या पंपाची आतील कॉईल, स्टार्टर व पंपाची बॅटरी चोरी झाली. दिवाळीनंतर कांदा विक्रीतून पुरेसे पैसे आल्यावर सुरक्षेच्या उपाययोजनेचे नियोजन होते. परंतु, त्याआधीच चोरी झाली." - जयवंत साळवे, शेतकरी

The electric pump on the well here has been stolen.
Nashik : पतीच्या नावाने पैसे काढणे भोवले; जऊळकेच्या महिला सरपंच ठरल्या अपात्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yeola government clerk bribery news
Farmer’s Daughter Achieves CA Dream, Honors Late Father’s Wish
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Nashik Water Scarcity
Marathi News Esakal
www.esakal.com