Nashik News: जिल्ह्यात चार तालुक्यांना 13 जानेवारीपर्यंत दोन तास वीज

Electricity for two hours till January 13 in four taluks in district nashik news
Electricity for two hours till January 13 in four taluks in district nashik newssakal

Nashik News: सिंचनासाठी दारणा व पालखेड कालव्यातून पाणी सोडल्याने पाणीचोरी रोखण्यासाठी निफाड, येवला, सिन्नर, दिंडोरी तालुक्यांतील गावांना सकाळी सहा ते आठपर्यंत वीज मिळणार आहे.

उर्वरित २२ तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. तब्बल १३ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. (Electricity for two hours till January 13 in four taluks in district nashik news)

गोदावरी उजव्या आणि डाव्या तट कालव्यावरील तसेच दारणा, गोदावरी या नदीच्या पाण्यावर अवलंबून गावांतील शेतीला सिंचनासाठी एक हजार ८५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन ९ डिसेंबरपासून सोडण्यात आले.

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राह्मणवाडा, तारूखेडले, खानगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, नांदूरमध्यमेश्वर, धारणगाव वीर, गाजरवाडी, धरणगाव खडक, कानळद, देवगाव, शिरवाडे, वाकद, धानोरा, नांदगाव, दहेगाव, रूई या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील चोंढी, मेंढी, सांगवी, सोमठाणा, दहिवाडी, कोळगाव माळ, पाथरे बुद्रुक, शहापूर, वारेगाव, कोळगाव थडी, हडेवाडी या गावांसह येवल्यातील महालखेडा, निमगाव मठ, मुखेड, सत्यगाव या गावांच्या कालव्यालगतचे रोहित्र बंद करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

पालखेड धरणातून पालखेड डाव्या कालव्यावरील गावांसाठी सिंचनाचे ९९९ दशलक्ष घनफूट, बिगर सिंचनासाठी एक हजार दक्षलक्ष घनफूट, तसेच एकूण १९९९ दशलक्ष पाण्याचे आवर्तन १२ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान सोडण्यात येत आहे. या कालव्यालगतच्या गावांतील वीजपुरवठा २१ तास खंडित करण्याचे आदेश आहेत.

Electricity for two hours till January 13 in four taluks in district nashik news
Nashik Winter Update: नाशिकचे कमाल तापमान राज्‍यात निच्चांकी; 24.7 अंश सेल्सिअसची नोंद

यात दिंडोरी तालुक्यातील जोपूळ, लोखंडेवाडी, चिंचखेड या गावांसह निफाडमधील उंबरखेड, पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, लोणवाडी, पालखेड मिरचीचे, कारसूळ, दावचवाडी, देवपूर, पंचकेश्वर, रौळस पिंप्री, उगाव, खेडे, शिवडी, नांदुर्डी, रानवड, ब्राह्मणगाव, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सारोळे, कोटमगाव, वनसगाव, सोनेवाडी खुर्द, रामपूर, नैताळे, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव वीर, डोंगरगाव, विष्णूनगर, हनुमाननगर, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, लासलगाव, मरळगोई खुर्द, मरळगोई बुद्रुक, गोंदेगाव, शिवापूर, पाचोरा बुद्रुक, पाचोरा खुर्द या गावांचाही वीजपुरवठा बंद राहील.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने बुद्रुक, मुखेड, सोमठाणे, जळगाव ने., निळखेडे, लौकी, शिरसगाव, वळदगाव, पाटोदा, दहेगाव, ठाणगाव, पिंप्री, मुरमी, आडगाव, धुळगाव, अंतरवेली, धानोरे, नांदूर, बाभुळगाव खुर्द, बाभुळगाव बुद्रुक, बल्हेगाव, भाटगाव, नगरसूल, धामणगाव, सायगाव व अंदरसूल गावातील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Electricity for two hours till January 13 in four taluks in district nashik news
Nashik News: दिव्यांग भवनाचे रात्रीतून उरकले उद्‍घाटन; जिल्हा परिषदेसह शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com