const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Nashik News: दिव्यांग भवनाचे रात्रीतून उरकले उद्‍घाटन; जिल्हा परिषदेसह शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

Disabled Person News
Disabled Person Newsesakal

Nashik News : सरकारी अधिकारी नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन प्रसंगी कायदा हातात घेण्यासाठी आमदार बच्चू कडू राज्यभर परिचित आहेत. सध्याच्या सरकारमध्ये आमदार कडू यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असूनही सरकारी यंत्रणेबरोबर काम करण्याचा त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडल्याचा प्रकार चांदवड तालुक्यात घडला.

जिल्हा परिषदेने दिव्यांग कल्याण सेस निधीतून चांदवड येथे बांधलेल्या दिव्यांग भवनाचे परस्पर रात्री पावणेबाराला उद्‍घाटन करून टाकले. यासाठी ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी परस्पर कार्यक्रमपत्रिकाही छापल्या होत्या. याबाबत मात्र, शासकीय यंत्रणा अनभिज्ञ दिसली. (Inauguration of Divyang Bhavan late at night nashik news)

जिल्हा परिषदेने समाजकल्याण योजनेतून दिव्यांग कल्याणसाठीच्या जिल्हा परिषद सेसच्या पाच टक्के निधीतून चांदवड येथे दिव्यांग भवन उभारण्याचा २०१८ मध्ये निर्णय घेतला. या दिव्यांग भवनास जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीने दिव्यांग भवन उभारण्यासाठी मान्यता दिल्यावर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या दिव्यांग भवनासाठी इमारत बांधकामासाठी ४२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली.

तसेच, या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे आदी कामांसाठीही ४५ लाख रुपयांची आणखी एक प्रशासकीय मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या सेसनिधीतून या दिव्यांग भवनाचे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित कामासाठी जिल्हा परिषदेचा सेस नसल्याचे तसेच प्रशासकीय कारकीर्द असल्याने त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

शासकीय कामकाज पद्धतीनुसार या दिव्यांग भवनाचे उद्‍घाटन पालकमंत्री, स्थानिक आमदार यांची वेळ निश्चित करून घेणे अपेक्षित असताना आमदार कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद यंत्रणेला अंधारात ठेवून परस्पर या उद्‍घाटन कार्यक्रमाच्या पत्रिका छापून घेतल्या.

Disabled Person News
Mahanubhav Sammelan: श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल : शरद ढोले

निमंत्रण पात्रिकेतही शासकीय प्रोटोकॉलचा भंग करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिेषदेने तयार केलेले नसल्याने या पत्रिकेतील कोणाही लोकप्रतिनिधींना शासकीय यंत्रणेकडून निमंत्रण पत्रिका पोहोचलीच नाही.

त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या उद्‍घाटनावर खुली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रजेवर असल्याने त्यांचा प्रभार सांभाळत असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यावर ‘प्रहार’चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दबाव आणून कार्यक्रमास उपस्थित राहणे भाग पाडल्याची चर्चा आहे.

सहाय्यक ‘बीडीओ’ला नोटीस

चांदवडचे दिव्यांग भवन जिल्हा परिषदेच्या सेसमधून उभारले असून, त्याची जबाबदारी चांदवड पंचायत समितीकडे आहे. मात्र, चांदवडच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांची परवानगी न घेता या दिव्यांग भवन इमारतीचा उद्‍घाटन कार्यक्रम केला. यामुळे संबंधित सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली.

Disabled Person News
Nashik Winter Update: नाशिकचे कमाल तापमान राज्‍यात निच्चांकी; 24.7 अंश सेल्सिअसची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com