नाशिक: समांतर वीज परवाना देण्याच्या शासनाच्या हालचालींना ‘महावितरण’च्या कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नागपूर, जळगाव येथे खासगी कंपन्यांना वीज वितरण फ्रॅंचायझी देऊनही सेवा सुरळीत न झाल्याने अखेर पुन्हा ‘महावितरण’लाच जबाबदारी सोपवावी लागली होती. सध्या ‘महावितरण’ राज्यातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना सुरळीत सेवा पुरवत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना अशा परवान्यांचा लाभ देऊ नये, अशी मागणी संघटनांनी केली.