सलग दुसर्या दिवशी पावसाचा लपंडाव सुरुच

Electricity Power supply off
Electricity Power supply offesakal

नाशिक : शहर परिसरात गुरुवारी (ता.९) पासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली असताना पहिल्‍याच दिवशी बत्ती गुल झाली होती. शुक्रवारी (ता. १०) दुसऱ्या दिवशीदेखील अनेक ठिकाणी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहिला. या संपूर्ण प्रकाराबाबत मनस्‍ताप व्‍यक्‍त केला जात असून, घरगुती उपकरण प्रभावित होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

बहुप्रतिक्षित पावसाच्‍या सरींनी हजेरी लावल्‍याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. पावसाची सुखद अनुभूती घेत असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्‍याने गुरुवारी बहुतांश शहर काळोखात होते. तर, काही भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. या संपूर्ण प्रकारामुळे नागरीकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले.

पहिल्‍याच पावसात अशी स्‍थिती झाल्‍यावर पावसाळा कसा निघायचा, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात होता. दरम्‍यान, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीदेखील शहरासह उपनगरी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या वेळी विजेचा लपंडाव पुन्‍हा सुरू झाल्‍याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात येत होत्या.

Electricity Power supply off
Nashik : पावसाच्‍या सरींनी सुखावले नाशिककर

या गलथान कारभारामुळे घरगुती उपकरणे खराब होण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात आली. वीजपुरवठा विभागाने यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. दरम्‍यान, सायंकाळी अचानक अंधार होत असल्‍याने व्‍यावसायिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. विजेचा लपंडाव सुरू झाल्‍यानंतर नुकसान टाळण्यासाठी अनेक व्‍यावसायिकांना लवकर दुकान बंद करावे लागत आहेत. अद्याप पावसाळ्याचे चार महिने जायचे बाकी असल्‍याने वीजपुरवठा सुरळीत राहाण्यासंदर्भात आवश्‍यक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी व्‍यावसायिक वर्गाकडूनदेखील होते आहे.

येथे करा संपर्क

वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला, वीजवाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबरवर (१८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ / १९१२), तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ संबंधित महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Electricity Power supply off
Weather Update : पुढील तीन दिवसांत 'या' राज्यांत मुसळधार पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com