
Nashik Employees Strike : एल्गार ‘एकच मिशन जुनी पेन्शन’चा; कर्मचारी- शिक्षकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
नाशिक : सरकारी, निमसरकारी, नगरपालिका, आरोग्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी (ता.१६) जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
‘एकच मिशन जुनी पेन्शन’ चा एल्गार करत काढलेल्या या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते. (Elgar of One Mission Old Pension Strong show of strength by staff teachers Nashik Employees Strike news)

बेमुदत राज्यवापी संप सुरु असतांना जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी ईदगाह मैदान येथुन भव्य मोर्चा काढला, यावेळी मोर्चात सहभागी झालेले कर्मचारी
जुन्या पेन्शनसाठी मंगळवार (ता.१४) पासून सरकारी, निमसरकारी, नगरपालिका, नगरपरिषद, आरोग्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समन्वय समितीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. दोन दिवसांपासून शहर जिल्ह्यातील सगळे कामकाज ठप्प पडले आहे.
मात्र मागे न हटण्याची भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाशेजारील इदगाह मैदानापासून हजारोच्या संख्येने मोर्चा काढला. शासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी यात सहभागी झाले. इदगाहपासून शालिमारमार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यत मोर्चा काढण्यात आली.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून मोर्चा विसर्जित करण्यात आला. अनेक राजकिय व सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानावर येउन आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. भव्य मोर्चामुळे त्या भागातील वाहतूक काळ काही काळ ठप्प झाली होती.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
लोकशाही शिक्षक आघाडी (टीडीएफ) चे नेते माजी शिक्षक आमदार नाना बोरस्ते, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, शामसुंदर जोशी, सुनंदा जराडे, जीवन आहेर, संजय जाधव, ए. के. वाघ,
नाशिक जिल्हा महसूल संघटनेचे तुषार नागरे, दुर्गेश कुलकर्णी, चतुर्थश्रेणी कामगार संघटनेचे ज्ञानेश्वर कासार, राजेंद्र आहिरे,अरुण तांबे, सागर नागरे, उमाकांत ढाले, तलाठी संघटनेचे सतीष गाडे, निळकंठ उगले, रवि पगार, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, दिलीप थेटे, राज्य लेखा कोषागारे संघटनेचे संदीप पवार,
उल्हास गायकर, हेमलता धोक्रट, राजू कट्यारे, अण्णा भडांगे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अरुण आहेर, विजय हळदे, शिक्षक संघटनेचे मोहन चकोर, आयटक राज्य सचिव राजू देसले, कैलास वाघचौरे, पूजा पवार, उत्तम गांगुर्डे, दिलीप थेटे, वैभव गगे, राजेश राजवाडे आदींसह शिक्षक - शिक्षकेत्तर, व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले.
जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अरुण आहेर, विजय हळदे, शिक्षक संघटनेचे मोहन चकोर, आयटक राज्य सचिव राजू देसले, कैलास वाघचौरे, पूजा पवार, उत्तम गांगुर्डे, दिलीप थेटे, वैभव गगे, राजेश राजवाडे आदींसह शिक्षक - शिक्षकेत्तर, व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले. महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
जिल्हा रुग्णालयासमोरुन रॅली निघतांना त्या भागातील वाहातूक ठप्प झाली. शिक्षक शिक्षकांसह पदाधिकारी सगळ्या थरातील कर्मचाऱ्यांमुळे रॅलीला भव्य स्वरुप प्राप्त झाले होते. शालीमार चौकापासून रॅलीचा प्रतिसाद वाढत गेला राजकिय सभेच्या धर्तीवर अवघ्या मैदानावर गर्दीचा महापूर उसळला होता. रस्त्यावर दुर्तफा रॅलीमुळे वाहातूक ठप्प झाली होती. महात्मा गांधी रोडवरुन जातांना भव्य दिव्य रॅलीने रस्ता पुर्ण भरुन गेला होता.