Sharad Pawar Group: शरद पवार गटाकडून महिलांना भावनिक साद! तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन कुंकू घराघरांत पोचणार

Laxman Mandala, Anita Damle, Madhuri Ohol of the Nationalist Sharad Pawar group while presenting Tuljabhawani Mata's kunku to MP Supriya Sule.
Laxman Mandala, Anita Damle, Madhuri Ohol of the Nationalist Sharad Pawar group while presenting Tuljabhawani Mata's kunku to MP Supriya Sule.esakal

Sharad Pawar Group : सध्या निवडणुकांचा माहोल नसला तरी लोकसंपर्क टिकून राहण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार सध्या इव्हेंट शोधत आहे.

दोन दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्रोत्सवात सध्या स्वस्त दरात डाळवाटप, ना नफा- ना तोटा तत्त्वावर साखरवाटप, महिलांचे मोफत गरबा प्रशिक्षण यासारखे फंडे अवलंबिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने यंदा महिलांना भावनिक साद घातले आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने असणारे कुंकू देवळाली मतदारसंघात वाटप करण्यात येणार आहे.

यासाठी २०० किलो कुंकू मागवण्यात आला असून देवळाली मतदारसंघाला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा कुंकू घराघरांमध्ये वाटप केला जात आहे. (Emotional support for women from Sharad Pawar Group With touch of Tulja Bhawani Pawan Kunku will reach homes nashik)

सामाजिक संपर्काच्या या इव्हेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना वेगळ्या प्रकारे भावनिक साद घातली आहे. कुंकू हे स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक समजले जाते. नवरात्रात हळदी - कुंकूला महत्त्व आहे. सौभाग्याचे लेणे म्हणून स्री ही देवी मानून तिला कुंकू लावून सन्मान केला जातो.

महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ मानली जातात. त्यात तुळजापूर हे आदिशक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. तुळजापूरच्या तुळजाभवानी या शक्तिपीठाचे महत्त्व सर्वाधिक आहे. कारण ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.

यंदा देवळाली मतदारसंघांमध्ये आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सबंध महिला व त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे. मतदारसंघातल्या माऊलींसाठी २०० किलो कुंकू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने मागविला आहे.

Laxman Mandala, Anita Damle, Madhuri Ohol of the Nationalist Sharad Pawar group while presenting Tuljabhawani Mata's kunku to MP Supriya Sule.
Shivsena Thackeray Group: ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; 20 ऑक्टोबरला मोर्चा

हा कुंकू तुळजाभवानी देवीचा पदस्पर्श करून संपूर्ण मतदारसंघात आशीर्वाद रुपी दिला जाणार आहे. महिलांना आई तुळजाभवानीच्या आशीर्वाद मिळावे हा या मागचा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

"येणाऱ्या नवरात्राच्या सणाला देवळाली मतदारसंघातल्या भगिनींना आई तुळजाभवानीचे आशीर्वाद मिळावे यासाठी घराघरांत तुळजापूरवरून आणलेला २०० किलो कुंकू वाटप करीत आहोत. यासाठी भगूरच्या रेणुकामाता मंदिरापासून मोहिमेला सुरवात होणार आहे."

- लक्ष्मण मंडाले, शरद पवार गट

"सौभाग्याचं लेणे म्हणजे कुंकू असतो. तुळजापूरच्या देवीचे कुंकू रुपी आशीर्वाद सर्वांना मिळावे यासाठी आम्ही हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. महिलांचे आरोग्य चांगले राहून सुख समृद्धी समाधान चैतन्य प्राप्त व्हावे यासाठी आमचा हा लहानसा प्रयत्न आहे."

- अनिता दामले. महिला शहराध्यक्ष.

Laxman Mandala, Anita Damle, Madhuri Ohol of the Nationalist Sharad Pawar group while presenting Tuljabhawani Mata's kunku to MP Supriya Sule.
Nashik: खरेदीच्‍या उत्‍सवाला योजनांचा तडका..! नवरात्रोत्‍सवापासून दिवाळीपर्यंत बाजारपेठेत संचारणार चैतन्‍य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com