Nashik Police : ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंगवर भर

शहर कोणतेही असो, ते त्या शहरातील महिलांसाठी सुरक्षित असायला हवे. याच उद्देशाने नाशिक शहर पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
Nashik Police Commissioner Helpline
Nashik Police Commissioner Helplineesakal

"शहर कोणतेही असो, तेथील नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, पोलिसांबद्दल त्यांच्यात विश्वास असावा, पोलिस आणि शहरवासीयांमध्ये सुसंवादाच्या सेतूतून दृढ संबंध निर्माण व्हावे, ही येणाऱ्या काळाची गरज आहे. त्याच दृष्टिकोनातून ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंग करण्यावर आपला भर असणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबविण्यासह टवाळखोरी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू केली आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, नाशिक हे जसे आध्यात्मिक आणि औद्योगिक शहर आहे, तसेच ते शहरवासीयांसह शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षित असेल, याच हेतूने शहराचे कोअर पोलिसिंग राहील."

- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

(Emphasis on People Oriented Policing marathi article by nashik police commissioner sandip karnik news)

पोलिस आणि गुन्हेगार हे नातं पूर्वपरंपरेनुसार आजही कायम आहे. काळानुरुप पोलिस यंत्रणेत आमूलाग्र बदल झालेले आहेत. गुन्हेगारांची एकच चाकोरी कायम असली तरी अलीकडे आधुनिक साधनांमुळे गुन्ह्यांची पद्धत, रीत बदलली आहे.

परंतु गुन्हा करणे ही गुन्हेगारीची प्राथमिकता आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असले तरी सामाजिक पोलिसिंग (कम्युनिटी पोलिसिंग) ही आजची पोलिसांसाठी प्राथमिकता आहे.

शहराच्या, शहरातील नागरिकांच्या, शहरातील महिलांच्या सर्वांगीण सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांच्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे मी मानतो.

शहर कोणतेही असो, ते त्या शहरातील महिलांसाठी सुरक्षित असायला हवे. याच उद्देशाने नाशिक शहर पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

शहर पोलिस आयुक्तालयाकडून विशेष निर्भया आणि दामिनी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पथकांना विशेष प्रशिक्षणासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

या पथकांना शहरात गस्तीसाठी वाहने पुरविण्यात आलेली आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी मुली, महिलांची छेडछाडी करणाऱ्यांविरोधात या पथकांकडून धडक कारवाई केली जाते.

दिवस-रात्र ही पथके कार्यरत आहेत. शहरातील विविध महाविद्यालयांच्या आवारामध्ये शहर पोलिसांनी महाविद्यालयांमध्ये फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या विरोधातही विशेष मोहीम राबविली.

त्यामुळे अनेक विद्यार्थिनींनी पोलिसांशी संपर्क साधून टवाळक्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाईदेखील केली. पोलिसांबद्दल दाखविलेला विश्वास अशा कारवाईतून दिसून येतो.

नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना सेवा देण्याची भूमिका (सर्व्हिस अप्रोच) प्रशासनाची असावी, ही भूमिका घेऊन प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने समाजासाठी काम केले तर नागरिकांच्या समस्या सहज सोडविता येतात, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. याच अनुषंगाने ‘पीपल ओरिएंटेड पोलिसिंग’ करण्याकडे आपला कल आहे.

शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या सोडविण्याला प्राधान्यक्रम देत पोलिसिंग करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवादाचा सेतू निर्माण होतो.

स्ट्रीट क्राइम (टवाळखोरी) रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून सातत्याने ऑलआउट ऑपरेशन यांसारख्या मोहिमा राबविण्यात येतात. आपले शहर ‘झीरो टॉलरन्स’ असायला हवे. शहर पोलिस आयुक्तालयाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जातात.

विशेषतः टवाळखोरी रोखण्यासाठी रात्रीच्या गस्ती, पायी पेट्रोलिंग, मोकळ्या मैदानावर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाते. पोलिसांकडून गुन्हेगार, टवाळखोरांविरोधात कारवाई होत असल्याचे दिसले तर नागरिकांचाही विश्वास वृद्धिंगत होतो आणि नागरिकच

पोलिसांना यात सहाय्य करतात. पोलिस आणि नागरिक एकत्र आले तर स्ट्रीट क्राइमला आळा बसण्यास मदतच होते. हीच काळाची गरज आहे.

Nashik Police Commissioner Helpline
Nashik Police Helpline : व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या तक्रारींना आयुक्तालयाचा क्विक रिस्पॉन्स!

व्हॉट्सॲप हेल्पलाइन - ९९२३३ २३३११

सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांना तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याचे धाडस होत नाही. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतूच सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन ९९२३३ २३३११ या क्रमांकावर तक्रारीचा संदेश पाठविल्यास तत्काळ त्याची दखल शहर पोलिसांकडून घेतली जाते.

संबंधित पोलिस ठाण्याला कारवाईचे आदेश दिले जातात. या हेल्पलाइनमुळे अनेक मुली, महिलांना फायदाच झाला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारींची सोडवणूक केली गेली. त्यामुळे अनेक टवाळखोरांना पोलिसांनी धडा शिकविला.

सर्वाधिक तक्रारी छेडछाडी आणि कौटुंबिक स्वरूपाच्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांत सुमारे दीड हजार संदेश या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर आलेले आहेत.

आपल्या आसपास काही गैर होत असेल, मुली-महिलांची छेडछाडी होत असेल तर तसा संदेश या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर करा, तुम्हाला तत्काळ पोलिसांचा प्रतिसाद मिळतो.

Nashik Police Commissioner Helpline
Nashik Police: गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक ढमाळ यांची बदली! युनिट एकला शिंदे, युनिट दोनला माछरे यांची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com