Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यु

जिल्हा शासकीय रुग्णालयात माळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शनिवारी (ता.३) सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
Late Eknath Trimbak Gaikwad
Late Eknath Trimbak Gaikwadesakal

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात माळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शनिवारी (ता.३) सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

एकनाथ त्र्यंबक गायकवाड (रा. लहवित) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Employee dies in Nashik district civil hospital News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ गायकवाड हे रुग्णालयात माळी काम करायचे. शनिवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर आले होते.

मात्र बराच वेळ झाला तरी ते त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना दिसले नाहीत. काही सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्कही साधला असता, ते उचलत नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

त्यावेळी ते नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यास व डोक्यास गंभीर दुखापत झालेली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून सांगितले.

Late Eknath Trimbak Gaikwad
Nashik Crime : फर्नांडिसवाडीत गँगवॉरचा भडका! गोळीबार प्रकरणातील संशयिताला कोठडी

घटनास्थळावरील प्राथमिक अंदाजानुसार तेथील पाईपमध्ये पाय अडकून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मीतभाषी व सतत हसतमुख असा स्वभाव गायकवाड यांचा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रुग्णालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

Late Eknath Trimbak Gaikwad
Crime News : पळून गेलेल्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला; आई-वडिलांनी रात्रीतूनच कोयता काढला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com