अपुऱ्या मनुष्यबळाचा कर्मचाऱ्यांवर ताण; वीज केंद्रासमोर आंदोलन

Employees' agitation in front of Nashik Thermal Power Station
Employees' agitation in front of Nashik Thermal Power Station esakal

एकलहरे (जि. नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच तीनचे वार्षिक देखभालीचे काम पूर्ण झाले आहे. अंतिमतः बॉयलर क्षमता तपासणी करण्याची गरज असते व संच किमान ७२ तास चालविणे गरजेचे असताना या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने बुधवारी (ता. १६) दुपारी संयुक्त कृती समितीने मुख्य द्वारासमोर प्रशासन विरोधात द्वारसभा घेत घोषणाबाजी केली.

येथील औष्णिक विद्युत केंद्रात मनुष्यबळाची कमतरता आहे. अशाही परिस्थितीत संच क्रमांक तीनचे बाष्पक पॅसिव्हेशन करण्याची स्थानिक प्रशासनाची घाई सुरू आहे. परंतु, पुरेशा मनुष्यबळाअभावी सुरक्षिततेच्या अभावाने काही अघटित घडू नये म्हणून संयुक्त कृती समितीने वारंवार प्रशासनाला अवगत करूनही उपयोग होत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागल्याचे संदीप पारखे, राजेश काळे, शशिकांत पवार, सुरेश चौधरी यांनी द्वारसभेत बोलताना सांगितले. संच क्रमांक चार व पाच सद्यःस्थितीत वीजनिर्मिती करत आहेत. संच क्रमांक तीनचे वार्षिक देखभालीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बॉयलरची क्षमता चाचणी होणे आवश्यक असते, मात्र त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. अशावेळी बॉयलर प्रज्वलित केला आणि काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. या वेळी पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही तर संयुक्त कृती समिती टूल डाऊन आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला. यापूर्वीच येथील उपलब्ध मनुष्यबळ दुसरीकडे पाठविले तेव्हाही संघटनांनी विरोध केला होता. अखेर सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करणे भाग पडते असे सांगण्यात आले.

Employees' agitation in front of Nashik Thermal Power Station
नाशिक : वीज बंद केल्याने वायरमनला मारहाण

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच प्रशासनातर्फे आंदोलन न करण्याबाबतचे पत्र आंदोलनस्थळी पाठवण्यात आले. या वेळी सुयोग झुटे, अंबादास मुसळे, नरेंद्र खैरनार, नारायण देवकाते, सचिन विंचू, शशिकांत पवार, मिलिंद निरगुडे, सुयोग झुटे, शरद सोनवणे, सारंग येवले, किरण दिंडे, तुकाराम गावित, ज्ञानेश्वर नागरगोजे, चेतन वायदंडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

Employees' agitation in front of Nashik Thermal Power Station
नाशिक : नदी प्रदूषण मुक्तीसाठी; कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com