Employees Strike : सप्तश्रृंग गडावरील कर्मचाऱ्यांचे शुक्रवारपासून बेमुदत कामबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wani gad news

Employees Strike : सप्तश्रृंग गडावरील कर्मचाऱ्यांचे शुक्रवारपासून बेमुदत कामबंद

वणी (जि. नाशिक) : श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टमधील नाशिक वर्कर्स युनियनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या शुक्रवार (ता. २४)पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. (employees of Saptashrung Fort on indefinite strike from Friday nashik news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

याबाबत ट्रस्टसह प्रशासनाच्या विविध विभागांना युनियनचे सरचिटणीस तुकाराम सोनजे यांनी नोटीसद्वारे संपाचा माहिती दिली. दरम्यान, सप्तशृंग गडावर आदिमायेच्या चैत्रोत्सवास ३० मार्चपासून सुरवात होत असून, त्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासल्याने ट्रस्टचे विश्‍वस्त मंडळ काय कार्यवाही करते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

संघटनेने देवस्थानातील कामगार-कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत ट्रस्टकडे वेळोवेळी निवेदने दिली व चर्चा केल्या. तसेच, १२ डिसेंबर २०२२ला जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विश्‍वस्थ मंडळाचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई व अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चाही झाली होती.

त्यावेळी मागण्यांबाबत कालबद्ध निर्णय ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिले. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे येत्या २४ मार्चला पहिल्या पाळीपासून संपावर जावे लागत असल्याचे नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे. श्री. सोनजे यांच्यासह मुरलीधर गायकवाड, नारद अहिरे, शरद शिसोदे, देविदास वाघमारे, राजू गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.