‘विकसित नंदुरबार’साठी महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भर

‘विकसित नंदुरबार’साठी महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भर
Published on: 
मेन --- NSK26H35221 नंदुरबार : मातृशक्ती संवाद कार्यक्रमास उपस्थित विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी. --- महिलांच्या संकल्पनांचा आर्थिक धोरणात समावेश मातृशक्ती संवाद कार्यक्रम : उद्योग उभारणीतून रोजगारनिर्मितीचा निर्धार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : महिलांनी केवळ नोकरी शोधणाऱ्या न राहता स्वतःचे उद्योग उभारावेत. रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजिका बनावे, यासाठी महिला उद्योजकतेवर भर देण्याचा निर्धार करण्यात आला. ‘विकसित नंदुरबार’ आयोजित नंदुरबार डेव्हलपमेंट समीट अंतर्गत ‘मातृशक्ती संवाद’ परिषद घेण्यात आली. नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल आणि ‘योजक’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कोरीट नाका येथील भानुधन प्लाझाच्या ओरायझन हॉल येथे ही परिषद पार पडली. या वेळी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिलचे आशिष वाणी यांनी प्रास्ताविक केले. ‘योजक’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी विकास प्रक्रियेत लोकसहभागाचे महत्त्व सांगितले. महिलांनी मांडलेल्या सूचना व संकल्पनांचे दस्तऐवजीकरण केले जाईल. भविष्यातील विकास योजना आणि आर्थिक धोरणांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बचत गटांना जागतिक बाजारपेठ उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १६ हजार महिला बचत गटांच्या कामाचा आढावा अनिता सूर्यवंशी यांनी घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीत बचत गटांसाठी स्वतंत्र जागा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सुरेखा वळवी यांनी महिलांनी उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन केले. नंदुरबारमधील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याची संकल्पना मांडली. बचत गटांसाठी विक्री मंच विकसित करण्याची सूचना करण्यात आली. माविमच्या कांतागौरी बनकर यांनी महिलांच्या विकासासाठी पाणीपुरवठा, बाजारपेठांमधील स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता मांडली. रोजगारनिर्मितीवर भर हंगामी स्थलांतरामुळे महिला कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांवर डॉ. सुनंदा पाटील यांनी प्रकाश टाकला. नोकरदार मातांसाठी पाळणाघरे, वसाहतींच्या स्तरावर अभ्यासिका, दुर्गम भागात जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. जयंती देशपांडे, शीतल उत्तरवार आणि चेतना गोसावी यांनी मांडल्या. बोलीभाषांवर आधारीत उपक्रम, तसेच तोरणमाळ महोत्सवासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता क्षमावासी वसईकर यांनी व्यक्त केली. समारोपात डॉ. गजानन डांगे यांनी महिला सक्षमीकरण आणि जिल्हा विकासासाठी कृती आराखडा मांडला. यात लायन्स व रोटरी क्लबच्या सहकार्याने ५० स्वयंसेवी कायदेशीर सल्ला केंद्रे, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, महिलांची ‘स्किल रिपॉझिटरी’, डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण याबाबतची संकल्पना मांडण्यात आली. संस्थांचा सहभाग ‘मातृशक्ती संवाद’ परिषदेत जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी, व्यावसायिक व महिला संस्थांनी सहकार्य केले. या मध्ये वंदनीय मावशी केळकर स्मृती सेवा समिती, लायन्स क्लब फेमिना, लिनेस क्लब, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, स्मित सेवा फाउंडेशन, भारतीय स्त्री शक्ती, सूर्यवंशी तांबोळी बारी समाज महिला मंडळ, जागृती ब्राह्मण महिला मंडळ आदी संस्थांनी सहभाग घेतला. या परिषदेला डॉ. तेजल चौधरी, कल्याणी डांगे, पूनम बेडसे आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.