Nashik News : 5- 7 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास!; व्यावसायिकांच्या आशीर्वादाने अतिक्रमणे जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Main Road

Nashik News : 5- 7 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास!; व्यावसायिकांच्या आशीर्वादाने अतिक्रमणे जोरात

नाशिक : दिल्ली दरवाजा ते टिळकपथ सिग्नल हे अंतर खरे तर अवघे पाच- सात मिनिटांचे. परंतु अनेक काही व्यावसायिकांच्या आशीर्वादाने दुकानांसमोरील रस्त्यावरच दुकाने थाटण्यात आल्याने आधीच अरुंद असलेला हा रस्ता निम्मा झाला आहे. त्यातच गर्दीच्या वेळी रिक्षांसह चारचाकी वाहनेही या या ठिकाणी येत असल्याने या अंतरासाठी चक्क अर्धा तास लागत असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. (Encroachments from Delhi Darwaza to Tilakpath with traffic increased due to businessmans Nashik news)

शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून पूर्वी मेनरोडची ओळख होती. कालौघात शालिमार, कानडे मारुती लेन, दहिपूल, दिल्ली दरवाजा हा भाग ‘व्यावसायिक झोन’ म्हणून नव्याने विकसित झाला. त्यामुळे या भागात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. त्या तुलनेत रस्ते मात्र आहे, तसेच राहिले. त्यातच अनेक व्यावसायिकांनी दुकानासमोरील रस्त्यावरील जागा अन्य व्यवसायिकांना भाड्याने देणे सुरू केले. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

दोनशे ते हजार रुपये रोज

हा भाग आधीच अरुंद असल्याने पायी चालणेही अवघड होते. त्यातच दहिपुलापासून वीर सावरकर पथावरील अनेक व्यावसायिकांनी या जागा चक्क भाड्याने देणे सुरू केले आहे. त्यासाठी व्यवसायानुसार दोनशे ते हजार रुपये भाडे आकारले जात असल्याचे हे व्यावसायिकच सांगतात. मात्र, याचा मनस्ताप रस्त्याने चालणाऱ्यांना मात्र सहन करावा लागत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Dhule Crime News : कारसह पावणेतीन लाखांचा देशी दारूसाठा साक्रीतून जप्त

कारवाई ठरतेय केवळ फार्स

सर्वसामान्य नाशिककरांना ही अतिक्रमणे दिसतात. मग अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्‍न नागरिकासह येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांनी केला आहे. येथील अतिक्रमण निर्मुलन मोहीम केवळ फार्स असल्याचे काही व्यावसायिक सांगतात. ज्या दिवशी अतिक्रमण विभाग कारवाई करते, त्या दिवशी अतिक्रमणे होतच नाही.

म्हणजेच कारवाईबाबत संबंधितांना अगोदरच कल्पना दिली जात असल्याचे काहीजण सांगतात. सध्या महापालिकेत अधिकारीराज आहे, मात्र यातीलच कडून अतिक्रमणाला खतपाणी घातले जात असल्याचे मनपा कर्मचारी खासगीत सांगतात.

रस्ता नेमका कोणासाठी?

नेहरू चौक ते कानडे मारुती लेनपर्यंतच्या रस्ताच्या दोन्ही बाजू उंच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीच छोटा असलेला हा रस्ता अजून छोटा झाला आहे. त्यातच कानडे मारुती मंदिरासमोर रिक्षा थांबाही तसाच ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुकानांसमोरील पादचारी मार्गावरच विक्रेत्यांनी त्यांची वाहने तसेच विक्रीचे सामान ठेवत अतिक्रमणे हा ‘स्मार्ट’ रस्ता व्यावसायिकांसाठी की पादचाऱ्यांसाठी असा प्रश्‍न पडतो.

हेही वाचा: Nashik News : सकाळ सर्कलसह शहरातील 28 ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणार