Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

Pradip Gavai
Pradip Gavaiesakal

नाशिक : वीज हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण घटक आहे. वीज जितकी आवश्‍यक आहे तितकीच ती धोकादायकदेखील आहे. वीजेचा वापर करताना सावधानता बाळगणे गरजेचे असते. मात्र, काहीजण याबाबत सर्रास दुर्लक्ष करतात अन् असे करणे जिवावर बेतू शकते. वीजेचा धक्का लागल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

हीच गोष्ट लक्षात घेऊन समाजात वीज वापराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने सातपूर येथील वीज वितरण सहाय्यक अभियंता प्रदीप गवई यांनी वीज सुरक्षेबाबत सर्वसामान्यांसाठी गीत तयार केले आहे. वीज सुरक्षा अन् त्याचे नियम याबाबत हे गीत सर्वांना संबोधित करत आहे. (Engineer pradip gavai made Song for Electricity Safety Public awareness of precautions Nashik Latest Marathi News)

विजेपासून कोणालाही इजा पोचू नये, सर्वांना त्याविषयी सुरक्षितता अन् सावधानतेची जाणीव व्हावी, अशा सर्व महत्त्वपूर्ण विषयांच्या जनजागृतीसाठी या गीताची निर्मिती केली अशी माहिती प्रदीप गवई यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. मार्च २०२२ मध्ये या गीताच्या निर्मितीची सुरवात झाली. गीताचे लिखाण, रेकॉर्डिंग यासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी गेला. गीताची निर्मिती करताना महत्त्वपूर्ण बाबींची मांडणी व्हावी हा प्रमुख उद्देश होता, असेही श्री. गवई म्हणाले. लेखन प्रदीप गवई यांनी केले असून, त्यांनी याला आवाजदेखील दिला आहे. यासाठी शुद्धी कदम यांची साथ लाभली.

गीताला वीरेंद्र मोहिते, संध्या चव्हाण यांनी कोरस दिले असून, संयोजन मनोज शिवलिंग, रेकॉर्डिंग अमित माळवे यांनी केले आहे. निर्मितीसाठी प्रदीप गवई यांना माणिकलाल तपासे (कार्यकारी अभियंता), विकास आडे (जनसंपर्क अधिकारी, महावितरण), दीपक कुमटेकर (मुख्य अभियंता), डी. टी. सायनेकर (मुख्य व्यवस्थापक प्रशिक्षण), डी. एच. पडळकर (अधिक्षक अभियंता), भाऊसाहेब पाटील (कार्यकारी अभियंता), प्रदीप वट्टमवार (अति. कार्यकारी अभियंता), आकाश तायडे (अति. कार्यकारी अभियंता) यासह कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.

Pradip Gavai
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; तीर्थांच्या स्‍थान निश्‍चितीतून गोदावरी होणार प्रवाहित!

हिताकारणे बोलणे सत्त्य आहे ।

हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥

हिताकारणे बंड पाखांड वारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥

समर्थ रामदासांच्या या श्लोकानुसार आपले हित कशामुळे साध्य होईल आणि त्यासाठी काय करायचे तसेच काय टाळायचे हे महत्त्वाचे आहेच मात्र यासाठी आवाज उठवणेही तितकेच गरजेचे आहे. यानुसारच या गीताच्या गीतकाराने वीज विषयक सुरक्षितता अन् सावधानतेची जाणीव सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Pradip Gavai
Measles Awarness : गोवरबाबत NMCकडून जनजागृती मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com