Engineering Admission : अभियांत्रिकीच्‍या कॅप राउंड 20 जुलैपासून सुरु

Engineering and Technology admission
Engineering and Technology admissionesakal

Engineering Admission : बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेच्‍या प्रथम वर्ष पदवीच्‍या प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्‍यानुसार २० जुलैपासून पहिल्‍या कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. तत्‍पूर्वी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडेल.

अभियांत्रिकीच्‍या प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वेळोवेळी वाढवून दिलेली होती. मंगळवारी (ता.११) वाढीव मुदत संपल्‍यानंतर प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्‍यानुसार तात्‍पुरती गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता. १४) प्रसिद्ध केली जाईल. (Engineering cap round starts from 20th July nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Engineering and Technology admission
Nashik News: NOC विरोधात बांधकाम संघटना एकवटल्या! शासनाच्या नगर विकास विभागाकडे घेणार धाव

यादीबाबत तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी १५ ते १७ जुलै अशी मुदत दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी १९ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. यानंतर पहिल्‍या कॅप राउंडमध्ये सहभागासाठी नोंदणीची मुदत २० ते २२ जुलै अशी असेल.

२५ जुलैला वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ ते २८ जुलै अशी मुदत दिली जाणार आहे. दुसऱ्या कॅप राउंडकरिता नोंदणीची मुदत ३० जुलै ते १ ऑगस्‍ट अशी असेल. या फेरीसाठी निवड यादी ३ ऑगस्‍टला प्रसिद्ध केली जाणार असून, प्रवेश घेण्यासाठी ४ ते ६ ऑगस्‍टदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे.

तिसऱ्या कॅप राउंडसाठी नोंदणीची मुदत ८ ते १० ऑगस्‍ट राहणार असून, १२ ऑगस्‍टला वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १३ ते १६ ऑगस्‍ट अशी मुदत असेल.

Engineering and Technology admission
NMC Pest Control Work: पेस्ट कंट्रोलचे काम वादग्रस्त ठेकेदाराकडे; डेंगीचा प्रकोप वाढत असल्याचे निमित्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com