
Corona Update : ॲक्टिव्ह रुग्ण 450 प्लस; 100 पॉझिटिव्ह
नाशिक : जिल्ह्यात दैनंदिन कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या तीन आकडी राहत आहे. मंगळवारी (ता. १२) जिल्ह्यात शंभर रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत ४४ ने वाढ झालेली आहे. सक्रिय बाधितांची संख्या साडेपाचशे पार झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ५५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Active Patient 450 Plus 100 Positive Nashik Corona update Latest Marathi News)
मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ५४, नाशिक ग्रामीण भागात ३८, मालेगाव महापालिका क्षेत्रात सहा रुग्णांना कोरोना लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर, जिल्हाबाहेरील दोघांना कोरोना लागण झाली आहे.
सध्या ५५७ बाधितांवर उपचार सुरू असून, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील २८७, नाशिक शहरातील दोनशे, मालेगावचे ४२, जिल्हा बाहेरील २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ८६८ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ७५६, नाशिक शहरातील ११२ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती.
हेही वाचा: नाशिक : जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच; मंगळवारी 3 वाडे कोसळले
मंगळवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ५. १८ टक्के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हीटी दर दहा टक्क्यांहून अधिक झाला असून, १०. २५ टक्के अशी नोंद झालेली आहे.
सध्याच्या सक्रिय रुग्णांपैकी अवघ्या आठ बाधितांमध्ये लक्षणे आढळून आलेली असून, त्यांच्यापैकी एका बाधिताला उपचारात ऑक्सिजनची आवश्यकता भासते आहे.
हेही वाचा: Nashik Rain Update : हत्ती नदीवरील पूलच गेला वाहून
Web Title: Active Patient 450 Plus 100 Positive Nashik Corona Update Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..