esakal | नाशिककरांना उन्हाळ्यात पाण्याबाबत नो टेन्शन!

बोलून बातमी शोधा

gangapur dam
नाशिककरांना उन्हाळ्यात पाण्याबाबत नो टेन्शन!
sakal_logo
By
सोमनाथ कोकरे

नाशिक : नाशिककरांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील, अशी स्थिती आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा गेल्या आठवड्यात ४२ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. आठ दिवसांपासून कश्‍यपी धरणातून पाणी येत असल्याने गंगापूरचा साठा ४८ टक्क्यांवर पोचला आहे.

कश्‍यपीचे पाणी सोडण्यात आल्याने गंगापूरमध्ये ४८ टक्के साठा

शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती गेल्यावर्षीपेक्षा यंदा चांगली आहे. दररोज नाशिककर सर्वसाधारण १३ ते १४ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करतात. गंगापूरमध्ये सद्य:स्थितीत २ हजार ७०९ दशलक्ष घनफूट, तर कश्‍यपीमध्ये ७९२, गौतमी-गोदावरीमध्ये ३०८ दशलक्ष घनफूट साठा आहे. कश्‍यपी आणि गौतमी-गोदावरी धरणातील पाणी आल्यावर गंगापूर धरणातील साठा ५२ ते ५३ टक्क्यांपर्यंत पोचेल.

धरणांमधील साठा

(आकडे टक्केवारीमध्ये)

धरणाचे नाव २९ एप्रिल २०२० २९ एप्रिल २०२१

गंगापूर ४१.२१ ४८.११

कश्यपी ८९.१४ ४२.७८

गौतमी-गोदावरी ३३.२९ १६.४८