JEE NEET Admission : खुशखबर! ग्रामीण विद्यार्थ्यांना जेईई- नीटची मोफत संधी; खर्च ZP करणार

JEE NEET Exam
JEE NEET Examesakal

JEE NEET Admission : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक लाख उत्पन्नाच्या मर्यादेतील गुणवत्ताधारक निवडक ११० विद्यार्थ्यांना २०२३-२०२४ व २०२४ - २०२५ या दोन वर्षांसाठी जेईई व नीट परिक्षेसाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी पात्रता प्रवेश परीक्षा २ जुलैला होणार आहे.

त्यासाठी २७ जूनपर्यंत दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नावे सादर करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले आहे. (entire expenses of eligible jee neet students will be borne by zp nashik news)

शासनाकडून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत २०२२ - २३ व २०२३ - २४ या दोन वर्षांसाठी नाशिक सुपर -५० हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना मार्च २०२३ मध्ये दहावीच्या परिक्षेत ७० टक्के गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांची जेईई व नीटसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी २ जुलैला परीक्षा होणार असून उच्चतम गुणांनुसार मुलांची यादी तयार करण्यात येणार आहे.

यात जेईईसाठी ५५ तर नीटसाठी ५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी असून पुढील भवितव्य उज्वल होण्यासाठी या संधीचा फायदा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याने या संधीचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JEE NEET Exam
Career Opportunity : तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला करिअरच्या संधीचा लाभ

शिक्षण विभागाकडे संपर्क साधल्यानंतर अर्जाचा नमुना दिला जाणार आहे. त्याचा कालावधी २७ जूनपर्यंत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर कनोज यांनी केले आहे.

विद्यार्थी विभाजन

आदिवासी उपयोजना टीएसपी अंतर्गत अनुसूचित जमाती ः ४० विद्यार्थी (२०- जेईई व २० नीट), अनुसूचित जाती १० विद्यार्थी (५- जेईई व ५- नीट), सर्वसाधारण प्रवर्ग- ६० विद्यार्थी (३०-जेईई व ३० नीट). उपरोक्त विद्यार्थी संख्येत जेइइ अभ्यासक्रमासाठी २ दिव्यांग विद्यार्थी व एनइइटी अभ्यासक्रमासाठी २ दिव्यांग विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात येईल.

पात्रता अशी असेल

मार्च २०२३ दहावीमध्ये ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण. एक लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा, अधिवास प्रमाणपत्र, अनुसूचित जाती व जमातीसाठी जातीचा दाखला, दिव्यांगासाठी ४० टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र.

JEE NEET Exam
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com