Nashik : तोफखान्यात पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटची एन्ट्री

CAT prize distribuion ceremony
CAT prize distribuion ceremonyesakal

नाशिक : नाशिक रोड येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन प्रशिक्षण केंद्रात (Combat Army Aviation Training Center) (कॅट) भारतीय लष्कराच्या (Indian Army) कॅप्टन अभिलाषा बराक या पहिल्या महिला लष्करी हेलिकॉप्टर पायलट (Military helicopter pilot) होण्याचा मान पटकावला. (Entry of first female helicopter pilot in artillery Nashik News)

लष्करातील प्रतिष्ठितेच्या एव्हिएशन विंग प्रदान सोहळ्यात आर्मी एव्हिएशनचे कर्नल कमांडंट, महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते विंग प्रदान करण्यात आले. आर्मी एव्हीएशनासाठी महत्वाची घटना म्हणून आज उल्लेख झाला. सिमला येथील आर्मी ट्रेनींग कमांड अंर्तगत कार्यरत असलेल्यानाशिक रोड येथील लष्कराच्या तोफखाना केंद्रालगतगांधी नगर एअरफील्ड या भारतीय सैन्याची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्थेत 37 व्या तुकडीतील लष्करी आधिकाऱ्यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स प्रशिक्षणानंतर विंग प्रदान कार्यक्रम झाला.

प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण घेतले. विविध विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल ट्रॉफी देण्यात आली. कॅप्टन आशिष कटारिया यांना प्रथम स्थानासाठी 'सिल्व्हर चिता' ट्रॉफी, ऑर्डर ऑफ मेरिट आणि '(बेस्ट इन फ्लाइंग)'साठी कॅप्टन एसके शर्मा ट्रॉफी. कॅप्टन श्रावण मणिलथया पीएम यांना प्रथम स्थानासाठी '(एअर ऑब्झर्व्हेशन) पोस्ट-35' ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ग्राउंड विषय. प्री आर्मी पायलट कोर्स सीरिअलमध्ये प्रथम येण्यासाठी 'कॅप्टन अभिलाषा बराक आणि 'कॅप्टन पीके गौर' यांना 'बेस्ट इन'साठी ट्रॉफी देण्यात आली. तर कॅप्टन आरके कश्यप यांना तोफखाना पुरस्कार देण्यात आला.

CAT prize distribuion ceremony
..तर सिटी लिंक वाहकांना करणार बडतर्फ!

भारतीय सैन्याचा एक महत्त्वाचा लढाऊ विभाग असलेल्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने 35 वर्षेाची गौरवशाली परंपरा आहे. बर्फाळ सियाचीन ग्लेसीयर तसेच वाळवंटी प्रदेशासह अनेक खडतर युध्दभूमीवर मदुर्मकी गाजविणारे भारतीय लष्करासाठी अनेक लष्करी आधिकारी या प्रशिक्षण केंद्राने दिले आहे. तीन वर्षापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपतींचे 'रंग' या केंद्राला प्रदान करण्यात आला.

CAT prize distribuion ceremony
Nashik : कारमधून 5 लाख रुपये लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com