Leopard Attack : दोन दिवसांत दुसरा हल्ला! चांदवडमध्ये बिबट्याने वृद्ध महिलेला गंभीर जखमी केलं
Leopard Attacks Elderly Woman in Rahud Village : पाडगण मळा भागात बिबट्याने ज्येष्ठ महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून या वृद्ध महिलेवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चांदवड- चांदवड तालुक्यातील राहूड येथील पाडगण मळा भागात बिबट्याने ज्येष्ठ महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून या वृद्ध महिलेवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज बिबट्याचा हा सलग दुसरा हल्ला आहे.