Farmer Protest
sakal
एरंडगाव: कांद्याचे सतत घसरत चाललेले भाव, शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावा लागणारा कांदा आणि इतरही शेतीमालामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतापला आहे. सरकार या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्याकडे लक्ष वेधत सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.२०) येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरकारच्या प्रतिमेस सडलेल्या कांद्याची माळ घालून निषेध नोंदविण्यात आला.