esakal | रिअल इस्टेट, ऑटोमोबाईलसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात तेजी; खरेदीदारांत उत्साह
sakal

बोलून बातमी शोधा

real estate.jpg

ग्राहकांची आर्थिक स्थिती खालावल्याने यंदा मोठ्या दुकानांपेक्षा छोट्या दुकानात किंवा थेट हातगाड्यांवर खरेदीला पसंती होती. अनेकांनी रेडिमेडला पसंती दिल्याने शर्ट पॅन्ट पीसला विशेष मागणी नव्हती. मात्र लहान मुलांच्या तयार कपड्यांना मोठी मागणी होती.

रिअल इस्टेट, ऑटोमोबाईलसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात तेजी; खरेदीदारांत उत्साह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंदावलेले नाशिकचे अर्थचक्र पुन्हा गतीमान झाले आहे. दीपोत्सवानिमित्त विविध मुहूर्त साधतांना रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, दागिणे खेरेदीसह इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली. दिवाळीतील विविध मुहूर्तांवर झालेल्या खरेदीतून विविध क्षेत्रांत कोट्यवधीची उलाढाल झाली.

१७ नोव्हेंबरपर्यंत आठशेपेक्षा अधिक कारची विक्री

दरम्यान ग्राहकांमध्ये मेक इन इंडिया उत्पादनाच्या मागणीवर जोर राहिल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले. यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवसाय होईल की नाही याबाबत व्यापारीवर्ग चिंतेत असतानाच गत आठ दहा दिवसांपासून बाजारात मोठे चैतन्य संचारले होते. त्यातच सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक आस्थापनांनी कामगारांना बोनसचे वाटप केल्याने रिअल इस्टेटसह वाहने, सोने-चांदी, इलेक्टॉनिक्स, फर्निचर व अन्य घरगुती वस्तुंच्या खऱेदीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कारच्या खरेदीत काहीशी घट झालेली असलीतरी कोरोनाच्या संकटातही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे शहरातील कारमॉलच्या चालकांनी सांगितले. यंदा १७ नोव्हेंबरपर्यंत आठशेपेक्षा अधिक कारची विक्री झाली. त्यात यंदा मारूतीच्या वाहनांबरोबरच हुंड्याईच्या कारला मोठी पसंती दिल्याचे दिसून येते. याशिवाय तब्बल दोन हजार दुचाकींची विक्री झाली.

गुंतवणुकीदारांची पहिली पसंती सोन्यालाच

गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तीन हजारच्या आसपास दस्तऐवजांची नोंद झाली होती. यंदा तब्बल साडेतीन हजारांपेक्षा जास्त दस्तांची नोंदणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत स्टॅम्पड्युटीत मोठी घट येऊनहमुद्रांक शुल्क व नोंदणी फीद्वारे तब्बल २७ कोटीहून अधिक रकमेच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणुकीदारांची पहिली पसंती सोन्यालाच राहिली आहे. त्यामुळे १ ते १७ नोव्हेंबर याकाळात सोने चांदीत तब्बल दोनशे कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. गतवर्षीपेक्षा ही उलाढाल २० ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

तयार कपड्यांना अधिक पसंती

कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहींचे उत्पन्न निम्म्यावर आले. याचा परिणाम कपड्यांच्या खऱेदीवर दिसून आला. ग्राहकांची आर्थिक स्थिती खालावल्याने यंदा मोठ्या दुकानांपेक्षा छोट्या दुकानात किंवा थेट हातगाड्यांवर खरेदीला पसंती होती. अनेकांनी रेडिमेडला पसंती दिल्याने शर्ट पॅन्ट पीसला विशेष मागणी नव्हती. मात्र लहान मुलांच्या तयार कपड्यांना मोठी मागणी होती.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

loading image