Nashik News : सभापती पिंगळेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराबाबत पुरावे EDकडे

ED News
ED Newsesakal

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात ६३ कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत पुरावे ईडीकडे सादर करण्यात आले असून भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती शिवाजी चुंबळे, भाजपा नेते दिनकर पाटील व सुनील केदार यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की तत्कालीन सभापती देविदास पिंगळे व त्यांच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात सुमारे ६३ कोटी ५४ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. बाजार समितीची शेकडो एकर जमीन बेभाव विक्री करण्यात आलेली आहे. या संदर्भात मागील वर्षी ईडीकडे चौकशीची मागणी केली होती.

त्याची दखल घेऊन ईडीकडून महिनाभरापूर्वी पुरावे सादर करण्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यानुसार आम्ही ४४ पुरावे व मुद्दे असलेले पत्र ईडीला सादर केलेले आहे. संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची करण्याची मागणी केली आहे. (Evidence of Corruption during Speaker Pingle tenure before ED Leaflet by Shivaji Chumbhale Patil Kedar Nashik Political News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

ED News
Nashik Exclusive Story : वैद्य जाधवांचा प्रबंध जागतिक आयुर्वेदमध्ये प्रथम

अन्नधान्य वाटप व टमाटा मार्केट गाळ्यांमध्ये १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांच्या नुकसानीची कागदपत्रे, २००० मध्ये मुदतवाढ व निवडणुकीसंदर्भातील पत्रव्यवहार, बाजार समितीने संपादित केलेले पांजरपोळ संस्थेच्या जमीन संदर्भातील कागदपत्रे, बाजार समितीत अतिक्रमित गाळे व त्याची केलेली परस्पर विक्री या संदर्भातील पुरावे, एकूण ६३ कोटी ५४ लाख ४७ हजार ८०१ रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे करण्यात आलेली फिर्याद आदी कागदपत्रे सादर केल्याचे पत्रात म्हटले आहे.

"नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही संस्था वाढवायला तीस वर्षे लागली. पंधरा लाख रूपयांपासूनचे उत्पन्न १८ कोटींपर्यंत नेत संस्थेला प्रगतीपथावर नेले. एवढेच नव्हे तर शासनाकडून अडीचशे एकर जमिन मिळवून संस्थेची मालमत्ताही वाढविली. मात्र काम न करता बाजार समितीचे १ कोटी ६५ लाख रूपये काढल्याप्रकरणी ज्यांची चौकशी चालू आहे असे दुसरे सेंट्रल गोदावरी संस्थेत पराभव झालेले व तिसरे बाजार समितीवर शासनामार्फत प्रशासक लादणारे असे हे सर्व असंतुष्ट एकत्र येऊन माझी बदनामीचा प्रयत्न करत आहेत, पण त्यातून काहीही साध्य होणार नाही."

- देवीदास पिंगळे, माजी सभापती, बाजार समिती

ED News
Nashik Crime News : मालेगावातील जाफरनगरात दोघांवर हल्ला; दोघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com