Nashik Exclusive Story : वैद्य जाधवांचा प्रबंध जागतिक आयुर्वेदमध्ये प्रथम

Nashik: While felicitating Dr. Vikrant Jadhav for getting the first prize for his thesis 'Ayurvedic Medicine through Telemedicine' at the World Ayurveda Congress in Goa on Tuesday, the president of the library Prof. Dilip Phadke. Along with library officials.
Nashik: While felicitating Dr. Vikrant Jadhav for getting the first prize for his thesis 'Ayurvedic Medicine through Telemedicine' at the World Ayurveda Congress in Goa on Tuesday, the president of the library Prof. Dilip Phadke. Along with library officials.esakal

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधील वैद्य विक्रांत जाधव यांनी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी आयुर्वेदिक उपचाराचा उपक्रम राबवला होता. त्यामध्ये ‘सकाळ'चा सक्रिय सहभाग राहिला आहे.

या उपक्रमावर आधारित ‘आयुर्वेद चिकित्सा टेलीमेडीसीन द्वारे' हा शोध प्रबंध गोव्यात झालेल्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये सादर केला. त्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

जागतिक स्तरावर शोध प्रबंधाची नोंद घेतल्याबद्दल आज सार्वजनिक वाचनालयातर्फे वैद्य विक्रांत जाधवांचा अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(Vaidya Jadhavs Dissertation First in World Ayurveda Nashik Exclusive Story News)

Nashik: While felicitating Dr. Vikrant Jadhav for getting the first prize for his thesis 'Ayurvedic Medicine through Telemedicine' at the World Ayurveda Congress in Goa on Tuesday, the president of the library Prof. Dilip Phadke. Along with library officials.
Nashik Crime News : शहरात गोवंश पिकअपसह सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त

वाचनालयाचे कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, प्रेरणा बेळे, व्यवस्थापक दिलीप बोरसे, सहाय्यक व्यवस्थापिका योगिनी जोशी आदी उपस्थित होते. देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड्. बगदे यांनी आभार मानले.

जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये ‘आयुर्वेद चिकित्सा टेलीमेडीसीन द्वारे' या शोध प्रबंधाविषयी संशोधक, वैद्यकीय अध्यापकांनी गौरवोदगार काढले. उपक्रमासाठी कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तत्कालिन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपील आहेर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

तसेच नाशिक आणि सुरगाणाचे नाव जागतिक पटलावर पोचवत असताना टेली मेडीसीनचा यशस्वी प्रयोग आदिवासी भागात होतो ही कौतुकाची बाब आहे, असे प्रा. फडके यांनी सांगितले.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Nashik: While felicitating Dr. Vikrant Jadhav for getting the first prize for his thesis 'Ayurvedic Medicine through Telemedicine' at the World Ayurveda Congress in Goa on Tuesday, the president of the library Prof. Dilip Phadke. Along with library officials.
Nashik News : राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर प्राणघातक हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

"शोध प्रबंधाचा उपयोग चिकित्सा पद्धती आणि आयुर्वेद विश्वातील शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी मदत होईल. तसेच नाशिकमधून शोध प्रबंधाच्या माध्यमातून एक संशोधन जागतिकस्तरावर पोचल्याचे समाधान आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मी नाशिककरांना अर्पण करत आहे."

- वैद्य विक्रांत जाधव

Nashik: While felicitating Dr. Vikrant Jadhav for getting the first prize for his thesis 'Ayurvedic Medicine through Telemedicine' at the World Ayurveda Congress in Goa on Tuesday, the president of the library Prof. Dilip Phadke. Along with library officials.
Nashik Crime News : मालेगावातील जाफरनगरात दोघांवर हल्ला; दोघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com